Posts

आयुष्यात भेटलेली माणसं

Image
  आयुष्यात भेटलेली माणसं लेख क्र.१ कोरोना प्रादुर्भावामुळे घरात बसून काय करायचे हा विचार चालला होता मग विचार आला की आपल्या आयुष्यात कुटुंबाव्यतिरिक्त अशी अनेक माणसे आपल्याला भेटली की ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाली व ज्यांचा आपल्या यशात, आपल्या जीवनात महत्त्वाचा वाटा आहे अशा व्यक्तींबद्दल लिहावं....पण प्रश्न पडला सुरवात कोणापासून करावी पण याबाबत जास्त पर्याय न येता पहिलं नाव आलं ते अर्थातचं प्रा. अनिल वर्तक सरांचं.. सर स.प. महाविद्यालय, पुणे या ठिकाणी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. सरांची आणि माझी भेट झाली ती S.P.कॉलेजमध्येच. मी M.A ला तिथे प्रवेश घेतल्यानंतर सुरवातीच्या काही दिवसात सरांचा व माझा फारसा संबंध आला नाही परंतू नंतर सरांच्या स्वभावामुळे व त्यांच्या क्रियाशील व्यक्तीमत्वामुळे सरांच्या खूप जवळ जाता आले. सरांनी ज्यावेळी ठरविले की अर्थशास्त्र विभागात अवांतर वाचनाची लायब्ररी सुरू करायची त्यावेळी ही जबाबदारी कोणा एका विद्यार्थ्याकडे द्यायचे हे ठरविले त्यावेळी त्यांनी ही जबाबदारी माझ्याकडे दिली. त्यावेळेस सरांबरोबर राहून काय व